विषयांचे लोलिंगत । त
3248.
विषयांचे लोलिंगत । ते फजीत होतील ॥१॥
न सरे येथे यातिकुळ । शुद्ध मूळबीज व्हावे ॥धृपद॥
शिखासूत्र सोंग वरी । दुराचारी दंड पावे ॥२॥
तुका म्हणे अभिमान । नारायणा न सोसे ॥३॥
अर्थ :
जे विषयभोग भोगणारे आहेत ते पुढे जाऊन फजितच होतील. मग तेथे उच्च जात कुळ हे काहीही पाहिले जात नाही तेथे केवळ मुळातच शुध्द असलेले बीज असावे लागते मग तो कोणत्याही जातीचा असो तरी त्याला शिक्षा आहे. जरी शेंडी जानवे धारण केले आणि वरवर परमार्थाचे सोंग केले आणि अंत:करणात दुराचार वृत्ती ठेवली तर त्या दुराचाऱ्याला यमलोकात दंड होणार म्हणजे होणारच. तुकाराम महाराज म्हणतात, नारायणाला अभिमान सहन होत नाही.
