सुखाचिये गोठी सुख आल
7.
सुखाचिये गोठी सुख आले भेटी । तया लाभासाठी जीव वेचिलागे माय ॥
तंव अवचिते सगुणरुप भरलेसे नयनी । बोलता अंगणी म्या वो देखियेले ॥१॥
जिवाचा जीऊ माझा भेटवा यादवराजा । उचलल्या चारी भुजा देईन क्षेम ॥२॥
न करा उपचार न रंगे हे मन । दृष्टिपुढे ध्यान ठसावले ।
आवडी गिळूनि येणे सुख विहरोनि ठेले । चित्त माझे गोविले गोवळेनी ॥३॥
आता भरोवरी उरविता नुरे उरी । आनंदे अंतरी कान्हो संचरला ॥
बापरखुमादेविवरु विठ्ठल निर्गुण । तो सुखाची सांठवण गिळूनि ठेला ॥४॥
