चरण गोमटे माय । पाहत
516.
चरण गोमटे माय । पाहता पाहता मन न धाय ।
पुनरपि फिरुनी तेथे जाय । ऐसा वेध होय तयाचा गे माय ॥धृ.॥
नवल गे माय न कले वेदा । आचोज विवाद शास्त्रंचिया ॥१॥
पुराणे भागली दरुशने विडावलीं । कांही केलिया न कळे तया ॥२॥
तो पुंडलिकाचे आवडी विटे धरुनी मीस । युगें अठठावीस उभा असे ॥३॥
परे परता परात्पर पश्यंती न कळे विचार । मा मध्यमा वैखरींचा निर्धार थकीत ठेला ॥४॥
एका जनार्दनी आहे तैसा देखिला । सबाह्म भरला हृदयी गे माय ॥५॥
