वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 46. विठ्ठलमाहात्म्य - अभंग ४८० ते ६६६

जे या चराचरीम गोमटें

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084357 · अभंग क्र. ५१७

517.
जे या चराचरीम गोमटें । पाहता वेंदां वाट न फूटे ।
ते पुंडलिकाचे पेठे । उभे नीट विटेवरी ॥१॥
सोपारा सोपारा झाला आम्हा । शास्त्रे वर्णिती महिमा ।
नकळे जो आगमा निंगमां । वंद्य पुराणा तिही लोकी ॥२॥
सहस्त्र मुखांचें ठेवणें । योगीं ध्याती जया ध्यानें ।
तो नाचतो कीर्तने । प्रेमभक्त देखोनी ॥३॥
एका जनार्दनी देखा । आम्हा झाला सुलभ सोपा ।
निवारुनी भवतापा । उतरीं पार निर्धारे ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग