डोईचा पदर आला खांद्य
225.
डोईचा पदर आला खांद्यावरी । भरल्या बाजारी जाईन मी ॥1॥
हाती घेईन टाळ खांद्यावरी वीणा । आता मज मना कोण करी ॥2॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल । मनगटावर तेल घाला तुह्मी ॥3॥
जनी म्हणे देवा मी झाले येसवा । निघाले केशवा घर तुझे ॥4॥.
