वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

क्षीरसागरीचें नावडे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086869 · अभंग क्र. ३३९०

3390.
क्षीरसागरीचें नावडे सुख । क्षीरापती देखे देव आला ॥१॥
कवळी कवळ पहा हो । मुख पसरुनी धांवतो देवो ॥२॥
एकादशी देव आला । क्षीरपतीलागीं टोकत ठेला ॥३॥
द्बादशी क्षीरापती ऎकोनी गोष्टी । आवडी देतसे मिठी ॥४॥
क्षीरापती घालिता वैष्णवा मुखी । तेणे मुखें होतसे सुखी ॥५॥
क्षीरापती सेविता आनंदु । स्वानंदे भुलला नाचे गोविंदु ॥६॥
क्षीरापती सेविता वैष्णवा लाहो । मुखामाजी मुख घालितो देवो ॥७॥
क्षीरापती चारा जनार्दन मुखी । एकाएकी तेणे होतसे सुखी ॥८॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग