वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 119. रुक्मांगदाची कथा - अभंग ३३६६ ते ३३९४

दशमी व्रताचा आरंभु ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086877 · अभंग क्र. ३३८९

3389.
दशमी व्रताचा आरंभु । दिंडी कीर्तन करा समारंभु । तेणे तो स्वयंभु । संतोष पावे ॥१॥
एकादशी जागरण । हरिपूजन नामकीर्तन । द्वादशी क्षीरापती जाण । वैष्णव जन सेविती ॥२॥
ऎसे व्रत तीन दिन । करी जो आदरे परिपूर्ण । एका जनार्दनी बंधन । तया नाही सर्वथा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग