भ्रम धरिसी या देहाचा
122.
भ्रम धरिसी या देहाचा ।
विठ्ठल म्हणे का वाचा ॥
पडोन जाईल कलेवर ।
विठ्ठल उच्चारी पा सार ॥
रखुमादेविवरू अभयकरू ।
मस्तकी ठेविला हा निर्धारु ॥
अर्थ :
उगाच मी म्हणजे देह हा भ्रम धरतोस. पण विठ्ठलनाम घेत नाहीस. हा देह कधी ही पडुन जाईल तेंव्हा साररुप विठ्ठल नाम उच्चार. असे नाम घेणाऱ्याच्या डोक्यावर रखुमाईचा पती आपला अभयकर ठेवतो.
