वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 1. उपासना कांड › ४, नाममाला > अभंग ११० ते १५५

विठ्ठल नाम नुच्चारिस

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-075036 · अभंग क्र. १२१

121.
विठ्ठल नाम नुच्चारिसी ।
तरी रवरव कुंडी पडसी ॥
विठ्ठल नाम उच्चारी ।
आळसु न करी क्षणभरी ॥
विठ्ठल नाम तीन अक्षरे ।
अमृतपान केले शंकरे ॥
रखुमादेविवरा विठ्ठले ।
महापातकी उध्दरिले ॥

अर्थ :
श्री विठ्ठल नाम मुखी घेतले नाहीस तर रवरव नरक कुंडात पडशील. विठ्ठल नामाचा सतत जप कर आळस करु नकोस. तीन अक्षरी विठ्ठल नाम अमृत असून त्याचे प्राशन श्रीविठ्ठलानी केले आहे. रखुमादेवीचा वर असणा-या विठ्ठलाने नाम साधना करणा-या साधकांना ह्रदयी धरले आहे असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग