शंखचूडाचा वध
174.
शंखचूडाचा वध
करिती गायन रामकृष्णहरी । गोकुळींच्या नारी जाती तेथे ॥१॥
शंख नामा तेथे आलासे गुह्यक । नाही त्या विवेक पापि-यासी ॥२॥
उपजला काम तयाचिया मना । घालोनी विमाना स्त्रिया नेत ॥३॥
धांव धांव रामा नेतसे हा आह्मा । अगा मेघश्यामा कृष्णनाथा ॥४॥
नेतो स्त्रिया काय न कळेचि देवा । यासी करू द्यावा अपराध ॥५॥
हाती वृक्ष दोघे ऐसे पाहोनिया । टाकोनी तो स्त्रिया पळतसे ॥६॥
घालितांचि वृक्ष प्राणासी मुकला । मणी त्याचा दिल्हा बळीभद्रा ॥७॥
भक्तांसाठी मारी दुष्टा जगजेठी । नामा ह्मणे तुटी विसरेना ॥८॥
