काळभये लंकापती सागरी
577.
काळभये लंकापती सागरी दुर्ग रचुनी वसे ।
चक्र फिरे भंवते दिनरात्री तो मग यमा गवसे ॥१॥
ज्यासी पराक्रम, देव बंदी घालुनी हासतसे ।
तो मरणाप्रती सापडला अरे प्रयत्न वृथाचि असे ॥२॥
होईल मग ते शेवटींचे पाहुनी स्वानुभवो ।
साध्य असो की असाध्य हो परी प्राक्तन दोहीसरिसे ॥३॥
बहिणी म्हणे न चुकेल विधीचे लेखन पूर्वील हो ।
प्रयत्न वृथा, परी कीजे पुरूषे प्रयत्न पराक्रम हो ॥४॥
