वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(व्यभिचारिणी स्त्रीच

🙏 3. संत तुकाराम · ABH-080487 · अभंग क्र. ३४४१

3441.
(व्यभिचारिणी स्त्रीचे रूपक)
आइकाल परी ऐसे नव्हे बाई । न संडावी सोई भ्रताराची ॥१॥
नव्हे आराणुक लौकिकापासून । आपुल्या आपण गोविले ते ॥२॥
तुका म्हणे मन कराल कठीण । त्या या निवडोन मजपाशी ॥३॥

अर्थ :
(महाराजांची बुध्दी कृष्णरुपामध्ये इतकी तल्लीन झाली की ते म्हणतात)अहो बाई आम्ही नि:संग आहोत आम्ही जे काही बोलू ते तुम्ही ऐकाल परंतू तसे करु नका बरे का, यासाठी तुम्ही तुमचा संसाररुपी नवऱ्याला सोडू नका. तुम्ही आपल्या आपणच बंधनात गोवून घेतले आहे त्यामुळे तुम्हाला लौकिकापासून शांती मिळणार नाही. तुकाराम महाराज म्हणतात, संसाराचा त्याग करण्याविषयी ज्या बयांनी मन कठीण केले आहे त्यांनीच निवडून माझ्याजवळ यावे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग