तीर्थ कानडे देव कानड
623.
तीर्थ कानडे देव कानडे । क्षेत्र कानडे पंढरीये ॥१॥
विठ्ठल कानडे भक्त हे कानेड । पुंडलीकें उघडें उभे केले ॥२॥
कानडीया देवा एका जनार्दनी भक्तें । कवतुके तयाते उभेंकेलें ॥३॥
एका जनार्दनी भक्ताचिय चाडा । विठ्ठलकानडा विटेवरी ॥४॥
