आकारिक नाम जीवाने ठे
701.
आकारिक नाम जीवाने ठेविले | शिवाने ते केले निर्विकल्प ॥१॥
जीव शिव दोन्ही विराले ज्यामाजी | ते नाम सहजी आद्य आहे ॥२॥
तया नामाविण जावयासी ठाव | नाही दुजा भाव तिळभरी ॥३॥
नामदेव म्हणे नाम घनदाट | प्रपंच निघोट नामापरी ॥४॥