पवित्र परिकर नाम हा
700.
पवित्र परिकर नाम हा उच्चार | उद्धरण साचार जगायया ॥१॥
गोविंद केशव उच्चार श्रीराम | न लगती नेम अमूप जप ॥२॥
ते हे विठ्ठल रूप पिकले पंढरी | नाम चराचरी विठ्ठल ऐसे ॥३॥
नामा म्हणे विठ्ठल सर्वात सखोल | उच्चारिता मोल नलगे तुज ॥४॥