वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

संत बहिणाबाईचे अभंग

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075976 · अभंग क्र. १

1.
संत बहिणाबाईचे अभंग गाथा

देवगाव माझे माहेर साजनी ।
वेरूळ तेथोनी पूर्व भागी ॥१॥
देवांचा समूह सर्व जये ठाई ।
मिळालासे पाही देवगावी ॥२॥
हिमालयाहुनी चालिला अगस्ती ।
चातुर्मास्य वस्ती केली जेथे ॥३॥
तेथुनी पश्चिमे सिवनद वाहात ।
तीर्थ हे अद्भुत तीर्थांमाजी ॥४॥
लक्ष-तीर्थ जेथे येऊनी सर्वदा ।
लक्षायणी सदा वास तेथे ॥५॥
ते स्थळ पवित्र देखोनी अगस्ती ।
अनुष्ठाना येती दिनोदई ॥६॥
वरद दिधला ऋषी अगस्तीने ।
लक्ष तीर्थे जाण लाक्षाग्रामा ॥७॥
स्नान दान करी जप अनुष्ठान ।
सिद्धी तेथे जाण होय नरा ॥८॥
अगस्ती राहोनी देवगावी जाण ।
शिवनदीस्नान करी सदा ॥९॥
बहेणि म्हणे ऐसे देवग्राम ।
तेथे माझा जन्म जाला असे ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग