असो आता ऐसा धंदा । त
3470.
असो आता ऐसा धंदा । तुज गोविंदा आठवू ॥१॥
रक्षिता तू होसी जरी । तरि काय येरी करावे ॥धृपद॥
काया वाचा मन पायी । राहे ठायी करू ते ॥२॥
तुका म्हणे गाइन गीती । रूप ते चित्ती धरूनिया ॥३॥
अर्थ :
हे गोविंदा आता शाक्त उपासकांची निंदा करण्याचा व्यापार पुरे झाला खूप झाला यापुढे तुझे स्मरण करुन तुझेच चिंतन नेहमी करु. अरे तू जर आमचा रक्षणकर्ता झालास तर आम्हाला इतरांचे काय करायचे आहे ? आम्ही कायावाचामनाने तुझ्या पायाच्याच ठिकाणी राहू असेच उपाय करु. तुकाराम महाराज म्हणतात, देवा तुझे रुप मी माझ्या चित्तामध्ये साठवून तुझे गीत गाईन.
