वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ७. सार्थ अभंग ३००१ ते ३५००

(वाममार्गी शाक्तांचा

🙏 3. संत तुकाराम · ABH-080476 · अभंग क्र. ३४६९

3469.
(वाममार्गी शाक्तांचा निषेध शाक्ता वरील अभंग)
बहुत गेली वाया । न भजता पंढरीराया ॥१॥
करिती कामिकांची सेवा । लागोन मागोन खात्या देवा ॥धृपद॥
अवघियांचा धनी । त्यासी गेली विसरोनि ॥२॥
तुका म्हणे अंती । पडती यमाचिया हाती ॥३॥

अर्थ :
पंढरीरायाचे भजनपूजन केले नाही त्यामुळे खूप लोक वाया गेले आहेत. भक्त आपल्याला काहीतरी नैवेदय आणेल आणि आपले पोट भरेल या अपेक्षेने तो देव त्याच्या कामिक भक्ताची सेवा करतो मग त्या भक्ताचे नैवेदय तो सेवन करतो पण ते सर्व व्यर्थ आहे. परंतू सर्वाचा जो मालक आहे असा पंढरीराया त्यालाच सर्वजण विसरुन गेलेले असतात. तुकाराम महाराज म्हणतात, शेवटी हे लोक यमाच्याच हाती पडतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग