वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

मग अष्टदिशा व्यापुनी

🙏 4. संत नामदेव · ABH-081703 · अभंग क्र. १०१२

1012.
मग अष्टदिशा व्यापुनी | तीर्थे राहिली स्थानी स्थानी | आळंकापुरी पाटणी | इंद्रायणीचा तटी ॥१॥
धन्य धन्य सृष्टीतळी | आळंकापुरी महितळी | कीर्तन करिता वैष्णव मेळी | ते चतुर्भुज नर होती ॥२॥
मग पुंडलिकासी सांगितले | कृष्णपक्षी येथे पाहिजे आले | येरु म्हणे स्वामीने सांगितले | ते शिरसा वंदिन ॥३॥
देव म्हणे आम्ही तुम्ही |पंढरीहुनि समागमी | येवोन आळंकापुरी ग्रामी | सकळ तीर्थांसहित ॥४॥
मग व्यास वाल्मिक बोलीविले | त्यांसही हे तीर्थ सांगितले | हे तिही शिवपीठ ऐसे म्हणितले | जुनाट असे केशवा ॥५॥
या शिवतीर्थाचा महिमा | कविता वर्णवेल पुरूषोत्तमा | पंढरी पांडुरंग महात्मा | भीमातीरही उत्तम ॥६॥
आणिक आइके वो सर्वोत्तमा | येथे अधिक अष्टतीर्थ ग्रामा | पंचक्रोशीची उपमा | सिद्धि होती तात्काळ ॥७॥
ब्रह्मा विष्णु इंद्र तप | आणि योगेश्वर उमप | पाताळी शेष समीप | याज खालता आहे ॥८॥
स्कंदासी उपदेश स्थान | लोहोगिरीसी येऊन | पुरुरवा पुण्य क्षेत्रमहिमान | पूर्वी येथुनि जाले ॥९॥
येथून भीमरथी नदी | भीमाशंकरा घेऊनि गेला नंदी | तेथुनि उगमी पडली सर्वा आधी | मग शंकरे तेथे स्नान केले ॥१०॥
ते भीमा माहात्म्य प्रसिद्ध | तो हा सिद्धेश्वर अगाध |महा योगेश्वरा निजबोध |आळंकापुर पाटणी ॥११॥
ऐसे व्यास बोले तये क्षणी | नामा गेला लोटांगणी | समाधी मूळपीठ स्थानी | आळंकापुरी ज्ञानदेव ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग