वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 149. श्री ज्ञानेश्वर समाधी महिमा

ऐसे पांडुरंग बोलिले

🙏 4. संत नामदेव · ABH-081698 · अभंग क्र. १०११

1011.
ऐसे पांडुरंग बोलिले |मग सकळ तीर्थांसी सांगितले | आळंकापुरी वसिजो वहिले | भक्त तारावया ॥१॥
जो जो करील कीर्तन| तो तो तरेल जाण |आळंकापुरी नारायण |स्वये उभे असती ॥२॥
ऐसा निरोप तीर्थांसि |ते तिष्ठति अहर्निशी |कीर्तन करिता गजरेसि | वैकुंठासी नेवो म्हणती ॥३॥
देव म्हणे यमुना नर्मदा | सरस्वति भागीरथी त्रिविधा | गंगा क्रुष्णा तुंगभद्रा | इंद्रायणीस मिळावे ॥४॥
जो जो भक्त येईल स्नाना | तो पवित्र करावा ये क्षणा | वैकुंठ कैलासापर्यंत जाणा | त्यासी घेवुनि यावे ॥५॥
हो म्हणती तीर्थे सकळे | मग मीनली आपुलेनि मेळे | गुप्त राहोनि यथाकाळे |आज्ञा शिरसा वंदिती ॥६॥
गया काशी त्रिवेणी | त्या शोभती विठ्ठलचरणी | ज्ञानदेवा समाधिरंगणी |अखंड वाहो लागल्या ॥७॥
सुवर्णाचा अश्वत्थ | द्वारी स्थापुनि निवास | भोवते देव्हडे तापस |समाधीस बैसले ॥८॥
देव म्हणे जो करील तप | तो होईल निष्पाप | केवळ होईल शिवरूप | आत्माराम साक्षात ॥९॥
जप तप नेम मंत्र ध्यान | कोटि याग घडले पूर्ण | अथवा द्विजी दिधलिया अन्न | चतुर्भुज नर होती ॥१०॥
ऐसे वचन सांगे हरी | ज्ञानदेवासी धरिले करी | निव्रुत्ति सोपान अंतरी |ध्यान धरोनी राहिले ॥११॥
नामा म्हणे कोटि तीर्थांचे | तीर्थ वोळले पै साचे | पाप जाईल अनंत जन्मांचे |एक स्नान केलिया ॥१२॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग