गायी घेवोनिया जासी ज
165.
गायी घेवोनिया जासी जेव्हा राना । आमुचिया मना दु:ख वाटे ॥१॥
सुकुमार सांवळी जैसी रातोत्पळे । त्याहूनि कोंवळे पाय तुझे ॥२॥
खडे कांटे बहू कठिण तृण मुळे । ठेवीसी पाउले त-यावरी ॥३॥
पावतोसी क्लेश अगा वासुदेवा । म्हणोनिया जीवा दु:ख वाटे ॥४॥
सांगतसो आम्ही नित्य यशोदेसी । धाडू नको यासी वनामध्ये ॥५॥
नामा म्हणे होय सकळांचा उद्धार । म्हणोनी श्री-धर वना जाय ॥६॥
