वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 2. संत ज्ञानेश्वर › 1. संत ज्ञानेश्वर सार्थ अभंग गाथा › 2. ज्ञानकांड › १०, देवापाशी प्रेमाचे भाषण अभंग ७९१ ते ८२०

अवघा डोळा तुज म्या प

🙏 2. संत ज्ञानेश्वर · ABH-074538 · अभंग क्र. ८१४

814.
अवघा डोळा तुज म्या पाहावे ।
अवघा श्रवणी तुजची ऐकावे ॥१॥
अवघी मूर्ति तुजपे ध्यावे ।
अवघा चरणी तुझ्या पंथी चालावे ॥२॥
रखुमादेविवरु अदट दाविला ।
माझ्या देही वाढला ब्रह्माकारे ॥३॥

अर्थ :
मला असे वाटते की डोळ्यांनी तुलाच पाहावे. कानांनी तुझेच गुणानुवाद ऐकावे. तू सर्व व्यापक आहेस अशी कल्पना करुन तुझेच ध्यान करावे. पायांनी तुझ्या दर्शना करिता वाट चालावी. याप्रमाणे काया, वाचा, मने करुन रखुमादेवीचे पती जे श्रीविठ्ठल त्यांचा ध्यास लागल्यामुळे ते सर्वत्र कोंदून भरले आहेत. असे ज्ञान मला श्रीगुरु निवृत्तिरायांनी करून दिले. व ते ज्ञान ब्रह्मरुपाने माझ्या शरीरामध्ये कायमपणाने प्रगट झाले. असे माऊली सांगतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग