वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आहा आहा रे भाई । नमो

🙏 3. संत तुकाराम · ABH-079390 · अभंग क्र. ३९५८

3958.
आहा आहा रे भाई । नमो उदासीन झाले देहभावा । आळविती देवा तया नमो ॥१॥
नमो तीर्थ पंथे चालती तयांसी । येती बोळवित त्यासी नमो ॥२॥
नमो तया संतवचनी विश्वास । नमो भावे दास्य गुरुचे त्या ॥३॥
नमो तया मातापित्यांचे पाळण । नमो त्या वचन सत्यवदे ॥४॥
नमो तया जाणे आणिकाचे सुखदुःख । राखे तहान भुक तया नमो ॥५॥
परोपकारी नमो पुण्यवंता । नमो त्या दमित्या इंद्रियांसि ॥६॥
तुका म्हणे नमो हरीचिया दासा । तेथे सर्व इच्छा पुरलीसे ॥७॥

अर्थ :
हे भाईंनो जे देहभावाविषयी उदासीन झाले आहे त्यांना नमस्कार करु आणि जे देवाला आळवित आहे त्यांना आपण नमस्कार करु. जे लोक तीर्थयात्रेच्या मार्गाने चालतात त्यांना नमस्कार करु आणि जे त्यांना वाटे लावण्यासाठी त्यांच्याबरोबर जातात त्यांनाही नमस्कार करु. ज्यांचा संतांच्या वचनावर विश्वास आहे त्यांनाही नमस्कार असो आणि भक्तिभावपूर्वक गुरुचे जे दास आहेत त्यांनाही नमस्कार असो. जे मातापितांचा सांभाळ करतात त्यांना नमस्कार असो आणि जे नेहमी सत्य बोलतात त्यांनाही नमस्कार असो. जे इतरांचे सुख दु:ख जाणून घेतात व त्यांना तहान भूकेची बाधा होऊ देत नाही त्यांना नमस्कार करो असो. जे पुण्यवंत नेहमी दुस-यावर परोपकार करतात त्यांना नमस्कार असो आणि ज्यांनी इंद्रियांचे दमन केले आहे त्यांना देखील नमस्कार असो. तुकाराम महाराज म्हणतात, हरीच्या दासांच्या ठिकाणी माझा नमस्कार असो कारण त्यांच्या ठिकाणी माझ्या सर्व इच्छा पूर्ण होत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग