वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

भीतरी गेले हरी राहा

🙏 3. संत तुकाराम · ABH-079470 · अभंग क्र. ३९९७

3997.
भीतरी गेले हरी राहा क्षणभरी । होईल फळ धीर करावा ॥१॥
न करी त्वरा ऐके मात । क्षण एक निवांत बैसावे ॥धृपद॥
करूनी मर्दन सारिले पाणी । न्हाले देव अंग पुसी भवानी ॥२॥
नेसला सोनसळा विनवी रखुमाई । वाढिले आता ठायी चलावे जी ॥३॥
करुनिया भोजन घेतले आंचवण । आनंदे नारायण पहुडले ॥४॥
तुका मात जाणवी आता । सकळा बहुता होती चित्ती ॥५॥

अर्थ :
हरी शय्यागृहामध्ये क्षणभरासाठी गेले आहेत त्यामुळे भक्तजणहो तुम्ही थोडे स्थिर राहावे तुम्हाला त्यांचा प्रसादाचा लाभ होईलच परंतु तुम्ही थोडा धीर धरावा तुम्ही एक क्षणभर निवांत बसावे अजिबात घाई करु नका ही गोष्ट माझी तुम्ही ऐका. देवाच्या अंगाला उटणे लावून पाण्याने स्नान घालण्यात आले आहे आता भवानीमाता देवाचे अंग पुशीत आहे. देवाने सोनसळा नेसला आहे आणि जेवणास ताट वाढून ठेवले आहे आता त्या ठिकाणी जी महाराज तुम्ही चलावे अशी विनंती रखुमाई देवाला करीत आहे. नारायणाने भोजन केले व ते आचवले व आनंदाने पलंगावर पहुडले म्हणजे निजले. तुकाराम महाराज म्हणतात, आता जी गोष्ट सर्वांच्या चित्तामध्ये होती तीच गोष्ट मी सर्वांना माहिती करुन देत आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग