वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 11. उपदेश

बांधोनिया हात गयावळ

🙏 16. संत जनाबाई · ABH-074018 · अभंग क्र. २३०

230.
बांधोनिया हात गयावळ (गयाळ) मारिती ॥ दंड ते करिती मोक्षासाठी ॥1॥
गेले ते पितर मोक्षालागी तुझे । आता देंई माझे दक्षिणेसी ॥2॥
बापुडे केंश बोडिती मिशीदाढी । मग दक्षणा हिरडी खातसे हे ॥3॥
फाय काय सांगो मेल्याविण मुक्ती । नाही ते वांछिती स्वप्न सुख ॥4॥
अनंत जन्म मृत्यु होता जैसे दुःख । त्याहूनि अशेष आहे तेथे ॥5॥
भांबावले जन धावे आटाआटी । सोडूनिया कोटि अनंत पद ॥6॥
नलगे गाळावे नलगे तळावे । नलगे मरावे मुक्तीसाठी ॥7॥
मुक्ति लागे पाया जाऊनिया पाहे । जीव जाता देह जनी नाही ॥8॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग