गोपी स्थिती
206.
गोपी स्थिती
प्रात:काळी उद्धव स्रानासी चालिला । मिळालासे मेळा गोपिकांचा ॥१॥
परस्परे ह्मणती कोण आता आला । न्यावया नंदाला पाठविले ॥२॥
सकळांच्या प्राणा घेऊनिया येई । ह्मणोनिया पाही धाडी यासी ॥३॥
भ्रमरासी स्रिया कुशब्दे ताडिती । आव-डीने बोलती नाना शब्द ॥४॥
धावून उद्धवाचे धरीती चरण । आमुचे स्मरण करितसे ॥५॥
स्वरूपहीन आम्ही सुंदर कंसदासी । ह्मणोनि तुजसी पुसतसो ॥६॥
आह्मांसाठी तेथे जाऊनिया ह्मणे । एकदा चरण दावी सर्वा ॥७॥
गेल्या गोपिका त्यांची राख झाली । वाजवी मुरली तया जागा ॥८॥
नामा ह्मणे त्यांसी सांगे ब्रह्मज्ञान । श्रीकृष्ण कृपेने स्थिरावल्या ॥९॥
