मोर पिसा कुंचे ढळतात
230.
मोर पिसा कुंचे ढळताती अपार । येताती कुमर यशो-देचे ॥१॥
शिंगे पावे मोहर्या वाजती कुसरी । हुंबर आखरी गगन गर्जे ॥२॥
मोतियांचे घोंस चांदवे झळकती । कनक दंड ढाळिती रामकृष्ण ॥३॥
गौरज डौरळा पीतांबार भिनला । स्वेद जो दाटला मुख कमळी ॥४॥
रुळती वनमाळा कंठी गुंजाहार । तरू घोंस अपार खोविले शिरी ॥५॥
गजगती पाउले ठेविती भूमीवरी । धन्य ते संसारी डोळे देती ॥६॥
कुंकुम केशर रंगले रातोत्पळ । ध्वज वज्रां-कुश कमळ उर्ध्व रेखा ॥७॥
विमाने आकाशी झाली पै सकळ । धन्य ते गोकुळ म्हणती देवा ॥८॥
देव पुष्पवृष्टी करिती कृष्णावरी । अंबर जयजयकारी गर्जतसे ॥९॥
माडिया गोपुरी पाहती सुंदरी । यशोदेच्या करी लिंबलोण ॥१०॥
ओंवाळिला नाम्या शिंप्याचा दातार । रखुमादेवीवर श्रीविठ्ठला ॥११॥
