वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › १. सार्थ अभंग १ ते ५००

घेई घेई माझे वाचे ।

🙏 3. संत तुकाराम · ABH-077552 · अभंग क्र. ३९५

395.
घेई घेई माझे वाचे । गोड नाम विठोबाचे ॥१॥
तुम्ही घ्या रे डोळे सुख । पाहा विठोबाचे मुख ॥धृपद॥
तुम्ही ऐका रे कान । माझ्या विठोबाचे गुण ॥२॥
मना तेथे धाव घेई । राहे विठोबाचे पायी ॥३॥
तुका म्हणे जीवा । नको सोडू या केशवा ॥४॥

अर्थ :
हे माझी वाणी तू अवीट अशा गोड विठोबाचे नाम सतत घेत रहा. आणि आपल्या डोळ्यांना सांगतात, तुम्ही विठोबाचे मुख दर्शन घेण्याचे सुख नित्य घ्या. अहो कानांनो तुम्ही विठोबाचे गुणानुवाद श्रवण करा. हे मना, तू निरंतर तिकडेच धाव घे आणि विठ्ठलाच्या पायाशी सतत राहा. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवा, या केशवाला तू सोडू नकोस.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग