पूर्ण कृपा केली देवा
1751.
पूर्ण कृपा केली देवा | दिधली पादपद्मसेवा ॥१॥
पाये पाली पळाली | नामकीर्तनकल्लोळी ॥२॥
द्वारी तुळसी वृंदावन | अखंड नामसंकीर्तन ॥३॥
रंगमाळाच्या रंगणी | तेथे मुक्ति वाहती पाणी ॥४॥
जन्म वैष्णवकुळी यावा | घडो संताची हे सेवा ॥५॥
नामदेवाची आवडी | संतचरणी देतो बुडी ॥६॥
