जनार्दना हरि कृपाळू
1752.
जनार्दना हरि कृपाळू ह्लषिकेशा । पुराणपुरुषा तुज नमो ॥१॥
अव्यक्ता क्षेत्रज्ञ अचिंता कुटस्था भुवनत्रयनाथा तुज नमो ॥२॥
अनंत ब्रह्मांडे तुझिये उदरी । घनश्यामा हरि तुज नमो ॥३॥
देवराया तुझे कोमळ ह्लदय । कृपादृष्टी पाहे मजकडे ॥४॥
तुझा मी किंकर आहे वासुदेवा । अभय या जीवा देई आता ॥५॥
नामा म्हणे घाली चरणासी मिठी । बोले जगजेठी स्वामी माझा ॥६॥
