सकळ देवांचा नियंता ।
565.
सकळ देवांचा नियंता । माझी विठ्ठल माता पिता ॥१॥
तो हा उभा विटेवरी । कटे धरुनिया करी ॥२॥
मिरवे वैजयंती माळा । केशर कस्तुरीचा टिळा ॥३॥
मकराकार कुंडले । करी शंख चक्र शोभले ॥४॥
एका शरण जनार्दनी । विठ्ठल पाहे ध्यानीं मनी ॥५॥