कीर्तने सिद्धि कीर्त
1412.
कीर्तने सिद्धि कीर्तने सिद्धि । कीर्तने निरसे आधिव्याधी ॥१॥
कीर्तने काया कीर्तने माया । कीर्तने सर्व एक ठाया ॥२॥
द्वंद्व द्वैत भेद नुरेची ठाव । कीर्तनी तिष्ठें उभाचि देव ॥३॥
निद्रेमाजीं वोसणे देवो । म्हणे मज ठावो कीर्तनी ॥४॥
एका जनार्दनी कीर्तनासाठी । देव धावे भक्तापाठी ॥५॥
