वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

खाणोरीयांची पुसो घरे

🙏 3. संत तुकाराम · ABH-079917 · अभंग क्र. ४०७७

4077.
खाणोरीयांची पुसो घरे । जीही बरे पाळती ॥१॥
सांगती त्या जावे वाटे । धरोनी पोटामध्ये गोष्ठी ॥धृ॥
आली गेली होती ठाया । सत्य छाया कळली ॥२॥
तुका म्हणे आपुले बळ । युक्ती काळ कारण ॥३॥

अर्थ :
ज्यांनी देवाच्या निजस्वरुपावर दरोडा घालून त्याची चांगल्या प्रकारे पाळत ठेवली आहे अशाच लोकांचे घरी आम्ही विचारु. ते मला जे काही गुह्य गोष्टी सांगतील आणि जो कोणता मार्ग दाखवतील त्या मार्गाने आम्ही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ह्दयात साठवून जाऊ. ज्या संतांनी देवाच्या निजस्वरुपावर दरोडा घातला आहे ते संत देवाच्या ठिकाणी गेले आलेले आहेत त्यामुळे त्यांना देवाची खरी कृपा कळली आहे. तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी सांगितलेल्या मार्गावर तर जावेच परंतू आपल्याही ठिकाणी असलेल्या युक्ती आणि बळाचे वापर करावे म्हणजे योग्य काळ आला आणि योग्य वेळ आली की सर्व साधने सफल होतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग