वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

गुरुपरंपरा आम्हा चैत

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075952 · अभंग क्र. ४०१

401.
गुरुपरंपरा आम्हा चैतन्य बळी ।
तयाच्या स्मरणे आम्ही वैकुंठी बळी ॥१॥
नमस्कार हा तया साष्टांग माझा ।
वोवाळू जीवे साधु चैतन्य-राजा ॥२॥
चैतन्य हा सर्वगत व्यापकि गुरू ।
प्रगटला हा तुकाराम वेष दातारू ॥३॥
तयाचे हे ध्यान सदा माझे अंतरी ।
अंतरीचे ध्यान सबाह्याभ्यांतरी ॥४॥
नेणे स्नान दान जप आसन मुद्रा ।
सदा सर्वकाळ ध्याऊ चैतन्य पदा ॥५॥
बहेणि म्हणे आम्ही मुक्त गुरूचे ध्याने ।
प्रेमे भक्ति-भावे तया वोवाळू प्राणे ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग