कांही नव्हे तो । मूर
24.
कांही नव्हे तो । मूर्ताsमूर्त तो गे बाई ॥
सहजा सहज तो । सहज सुखनिधान तो गे बाई ॥
रखुमादेविवरु तो । पुंडलिकवरद तो गे बाई ॥
अर्थ :
हे जीवरुपी सखी, तो काही नसणारा, पण मूर्त अमूर्त असणारा, तोच आहे. सुखनिधान आहे, सहज करणारा तोच आहे व तोच सहजातील सहजत्व आहे. तोच पुंडलिकाला वरदान देणारा रखुमाईचा पती आहे असे माऊली सांगतात.
