वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › १६. मनास व जनांस उपदेश

जारण मारण स्तंभन मोह

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089006 · अभंग क्र. ८९१

891.
जारण मारण स्तंभन मोहन ।
वशीकरण उच्चाटण विध्वंसन आवडती ॥१॥
येणेचि मिरविती जगी ।
अशुचि अनुरागी निरंतर ॥२॥
जडयाबुटया हाती शिरी ।
ताईता भीतरी वागविती ॥३॥
निळा म्हणे चिरकाळ नरकी ।
वसावया कुंभपाकी पूर्वजेंसी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग