देह लावी हरिकीर्तनी
1433.
देह लावी हरिकीर्तनी । येर कारणीं पडुं नको ॥१॥
सोडी संसाराचा छंद । कीर्तनी गोविंद आठवा ॥२॥
होई दास संतचरंणीं । पायवणी वंदी तू ॥३॥
काया लावी देवाकडे । येर सांकडें वारिल ॥४॥
अनुमोदन सर्वाठायीं । मन देई हरिचरणीं ॥५॥
म्हणे जनार्दनाचा एका । काया वाचा भाविका सांगत ॥६॥
