महिमा याचा चतुर्मुखा
373.
महिमा याचा चतुर्मुखा ।
न करवेचि लेखा वर्णिता ॥१॥
सनकादिकाहि नित्य येती ।
पूजा करिती देवभक्ता ॥२॥
सुरवर आणि मुनिजन ।
संतसज्जन नित्य स्तविती ॥३॥
निळा म्हणे सकळही तीथे ।
होती कृतार्थ दर्शने ॥४॥
373.
महिमा याचा चतुर्मुखा ।
न करवेचि लेखा वर्णिता ॥१॥
सनकादिकाहि नित्य येती ।
पूजा करिती देवभक्ता ॥२॥
सुरवर आणि मुनिजन ।
संतसज्जन नित्य स्तविती ॥३॥
निळा म्हणे सकळही तीथे ।
होती कृतार्थ दर्शने ॥४॥