उठा चला जाऊ गे तेथवर
424.
उठा चला जाऊ गे तेथवरी ।
जेथे नांदे आमुचा आत्मा हरी ॥१॥
कैसा छंद लागला तया नारी ।
परपुरूषी अखंड दृष्टी वरी ॥२॥
कामाधामा विसरू कैसा जाला ।
कृष्णप्रेमा तो अंगी ठसावला ॥३॥
विसरल्या देहभाव जेथे तेथे ।
पहा कैसे व्यापिले कृष्णनाथे ॥४॥
बहेणी म्हणे वेधल्या कृष्णवाणी ।
त्याही गाइल्या वेदशास्त्रपुराणी ॥५॥
