शुकरा आणि श्वाना गर्
35.
शुकरा आणि श्वाना गर्दभासी जाणा ।
विष्ठेच्या भक्षणा कवण सागे ॥१॥
ज्याचा तो संसार घेउनिया उठे ।
लोका दुःख वाटे कासयासी ॥२॥
दंश करी ऐसे कोण सांगे सर्पा ।
विंचुवाच्या कोपा लोक कष्टी ॥३॥
व्याघ्र लांडग्यासी कोण सांगे कानी ।
राहोनिया अरण्यी जीव मारा ॥४॥
गोचीड ढेकूण हे रक्त भक्षिती ।
हे तया सांगती लोक कोई ॥५॥
बहेणि म्हणे पूर्वसंस्कार जीवाचा ।
प्रवर्तवी साचा न सांगता ॥६॥
