केळी आणि तया नारेळी
36.
केळी आणि तया नारेळी पोफळी ।
कोण घाली मुळी दुध तया ॥१॥
बीज तैसे फळ येत असे गोड ।
जाणती निवाड संत याचा ॥२॥
फणस आणि आंबा सिंताफळे नाना ।
मुळीचिया चिह्ना गोड होती ॥३॥
बहेणि म्हणे बीज गोड त्याचे फळ ।
उत्तम केवळ सेव्य सर्वा ॥४॥
