वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

पृथ्वी ही गिळिली उदक

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-075911 · अभंग क्र. ५८०

580.
पृथ्वी ही गिळिली उदकाने पाही ।
तेजे उदक नाही ऐसे केले ॥१॥
पहा विपरीत प्रळयो मांडिला ।
ब्रह्माग्नि लागला ब्रह्मत्वासी ॥२॥
वायूने तेज गिळिले एकसरा ।
ब्रह्मांड-पसारा शुकशुकाट ॥३॥
मग त्या आकाशे गिळियला वायो ।
ऐसा हा प्रळयो थोर जाला ॥४॥
यासी तो प्रळयो बोलिजे निश्चयो ।
महाप्रळय भये पुढे आहे ॥५॥
आकाश गिळिले विष्णु-महद्भूते ।
कैसे विपरीत जाले देखा ॥६॥
विष्णु म्हणायासी जो कोणी उरला ।
तयाचीया बोला ठाव नाही ॥७॥
ऐसा अवगा परी होऊन आभास ।
पूर्ण सावकाश नांदतसे ॥८॥
नित्य आनंदघन दाटे परिपूर्ण ।
बोले खंब्रह्म वेदवाणी ॥९॥
बहिणी म्हणे कैसे विपरीत केले ।
दुःख तेचि जाले सुखरूप ॥१०॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग