वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

लाज नाही येथे येऊनि

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076438 · अभंग क्र. ५७९

579.
लाज नाही येथे येऊनि संसारा ।
नरकाचा थारा भोगावया ॥१॥
किती मरमर सोसणे अघोर ।
नेघे तो विचार स्वहिताचा ॥२॥
कासया संपत्ती जळो जळो जिणे ।
दिसे लाजिरवाणे एकाविणे ॥३॥
हत्ती घोडे दासी छत्री शेषासन ।
जळो हे भूषण एकाविण ॥४॥
सोयरे धायरे जळो इष्टमित्र ।
अवघे अपवित्र एकाविण ॥५॥
बहेणि म्हणे तनु अवघी हे चांगली ।
एकाविण गेली जन्म वाया ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग