वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 28. संत बहिणाबाई › 1. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई अभंग गाथा › १. संत बहिणाबाई गाथा

सराफापासी घेतले सोने

🙏 28. संत बहिणाबाई · ABH-076319 · अभंग क्र. ५८१

581.
सराफापासी घेतले सोने ।
न व्हावे कोणे भिडे त्याचे ॥१॥
जोखून पहावे कसोटीसी ।
घ्यावे कसी आगळे ते ॥२॥
जयाने घेतले त्याचे भिडे ।
नागवण घडे झाकिलिया ॥३॥
कसी कसोटीच्या आले ।
जाणावे ते वरच्या मोले ॥४॥
टांकसाळी कसिले नाणे ।
बहिणी म्हणे तेचि खरे ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग