वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 198. अन्य देवतांसंबंधी उपासकास उपदेश

अर्चन विष्णूचे नाही

🙏 4. संत नामदेव · ABH-081953 · अभंग क्र. १८९८

1898.
अर्चन विष्णूचे नाही पूजन | तये गांवींचे अनामिक जन |भूतप्रेताचे करिती भजन | तयासि दंडन यम करी ॥१॥
हरीचे वंचुनी सुकृत करी | तथा नाम पुण्य ठेवि जरी |तुटोनि पडो त्यांची वैखरी | अंती महाघोरी वास तया ॥२॥
समारंभ करिती आणिका देवांचा | म्हणती येणे विष्णु तृप्त होय साचा |धिग् धिग् आचार जळो त्याचा वायांविण वाचा विटाळली ॥३॥
पहा हो नवही द्वारे एकचि देही | रसस्वाद कान देतील काई |जयाचा मान तयाच्या ठायी | येतसे पाही सेविता ॥४॥
तो देवदेवा शिरोमणी | असुर रुळती जयाच्या चरणी |तो सांडिता चक्रपाणि | भजना हानी होईल तुझिया ॥५॥
विष्णुदास नामा विनवी जगा | अझुनि तरी हरिसि शरण रिघा |जे जे अपराध केले असतिल मागा | ते ते नेईल भंगा स्वामी माझा ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग