वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ८. सार्थ अभंग ३५०१ ते ४०९२

आड केले देवद्वार । व

🙏 3. संत तुकाराम · ABH-079445 · अभंग क्र. ४०१४

4014.
आड केले देवद्वार । व्यर्थ काय करकर ॥१॥
आता चला जाऊ घरा । नका करू उजगरा ॥धृपद॥
देवा लागलीसे निज । येथे उभ्या काय काज ॥२॥
राग येतो देवा । तुका म्हणे नेघे सेवा ॥३॥

अर्थ :
आता देवाचे द्वार लावले गेले आहे त्यामुळे व्यर्थ करकर करून काय उपयोग आहे? आता चला आपण घरी जाऊ व्यर्थ देवाला झोपेतून जागे करू नका. देवाला चांगलीच झोप लागलेली आहे मग येथे उभे राहून राहण्याचे काम आहे काय? तुकाराम महाराज म्हणतात आपण जर यावेळी देवाजवळ व्यर्थ बडबड केली तर देवाला राग येईल मग आपली सेवा तो घेणार नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग