जनी म्हणे पांडुरंगा
104.
जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जीवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥1॥
कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरी ।
पुंडलिकाच्या द्वारी । का उभा राहिलासी ॥2॥
कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद । का राहिला ॥3॥
कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊ दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥4॥
