जेवी जेवी बा मुरारी
103.
जेवी जेवी बा मुरारी । तुज वाढिली शिदोरी ॥1॥
कनकाचे ताटी । रत्नजडित ठेविली वाटी ॥2॥
आमुचे ब्रह्म सारंग पाणी । हिंडतसे रानोरानी ॥3॥
गोपाळाचे मेळी । हरि खेळे चेंडूफळी ॥4॥
तुळसीचे वनी । उभी राहे दासी जनी ॥5॥