जलक्रीडा
170.
जलक्रीडा
सकळांची इच्छा करीतसे पूर्ण । भुलला श्रीकृष्ण त्यांच्या भावा ॥१॥
विमानी बैसोनी सुरवर पाहाती । गंधर्द गाताती सप्त-स्वरे ॥२॥
विणे वाजताती मृदंगाचे घोश । वाचे तो उल्हास वर्ण-वेना ॥३॥
न जाय चंद्रमा न जाती नक्षत्रे । पाहाती सर्वत्र रास-क्रीडा ॥४॥
जलक्रीडा करी लक्षुमीचा पती । लाळ घोटीताती देवस्रिया ॥५॥
धन्य त्या गोपिका धन्य त्यांचे पुण्य । भोगिताती कृष्ण पूर्णब्रह्म ॥६॥
नामा ह्मणे होय कामाची ते पूर्ती । नव्हे वीर्यच्युती गोविंदाची ॥७॥
