वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 250. गोंधळ ३९२२ ते ३९३३

अंबऋषीकारणें गर्भवास

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-090477 · अभंग क्र. ३९३२

3932.
अंबऋषीकारणें गर्भवास सोसीशी । वेद नेतां चोरुनी ब्रह्मया आणुनी देसी ॥१॥ उदोबोला उदो कृष्णाबाई माऊलीचा हो । उदो बोलाउदो रामाबाई माऊलीचा हो ॥धृ.॥ हस्त लागतांशंखासुर पुजापद देसी । मत्स्यरुपीया हरिसागरधुंडीसी॥२॥रसातळां जाता पृथ्वी पाठीवरी घेसी । परोपकाराकारणे तळी कासव जाहलासी ॥३॥दाढे धरुनी अवनीवराहरुपधेसी । त्रिभुवन धुंडोनीचंद्रसुर्याते आणिसी ॥४॥ प्रल्हादाकारणें स्तंभीगुरगुरसी । रक्षुनियां भक्ता हिरण्यकश्यपु वधिसी ॥५॥सर्व समर्पण केले म्हणोनी प्रसन्न होसी । चिमणेरुपधरुनि बळीचें द्वारपाळपण करिशी ॥६॥ सहस्त्र अर्जुनलागी परशुरामहोसी । वधोनि दैत्यांसीपृथ्वीं ब्राह्मणा देसी ॥७॥ पितृवचनें करुनी वनवासवो करिसी । सीतेचेनि कैवारे रावण कुंभकर्णावधिसी॥८॥गोकुळी नंदाघरी रामकृष्ण तुंहोशी । चोरुनीनवनीत खाउनी कंसासी वधिसी ॥९॥ धर्मलोपलाअधर्म जाहला हे तुं न पहासी । यालागी बौध्दरुपंढरी नांदसी ॥१०॥ कलंकी अवतार श्रीहरि पुढेतुं घेसी । एका जनार्दनी शरणसर्वभावेसी ॥११॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग